तेऊरवाडी परिसरात गव्यांचा धुमाकूळ, वाहन धारकांनी सावधानता बाळगण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2023

तेऊरवाडी परिसरात गव्यांचा धुमाकूळ, वाहन धारकांनी सावधानता बाळगण्याची गरज

तेऊरवाडी जंगल परिसरात गव्यांचे दर्शन.

तेऊरवाडी / सी. एल.  वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) परिसरात जंगली गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. भर दिवसा आज सकाळी तेऊरवाडी -नेसरी मार्गावरून गव्यांनी  वाहन धारकांच्या समोरूनच रस्ता मार्गक्रमण केल्याने वाहन धारकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तर वन विभागाने या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

       तेऊरवाडी गावाला गव्यांचा नेहमीचाच त्रास आहे. कोरडवाहू गावात अपार कष्ट करून पिकवलेली शेती या गव्या कडून फस्त केली जात आहे. त्यामुळे वैताकलेल्या शेतकऱ्यांनी गावच्या उत्तरेकडील हजारो एकर शेती पड पाडली आहे. तर पाजर तलावावर काही शेतकऱ्यांनी ऊस पिक केले आहे ते गव्या कडून उध्वस्थ केले जात आहे. शाळू, हरभरा पिकांची तर तीन महिने अहोरात्र राखण करावी लागत आहे.

      आज सकाळी ७ वाजता २२ गव्यांच्या कळपाने वाहन धारकांच्या समोरूनच रस्ता पार केला. याचे चित्रीकरण प्रा. एस. ई. पाटील यांनी केले. सकाळी व सायंकाळच्या वेळी वारंवार असे कळप वाहन धारकांच्या नजरेस पडत आहेत. वन विभागाने या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment