चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गळयात टाळ, डोकीवर तुळस, खांद्यावर भगवी पताका अन् मुखात हरिनामाचा गजर असं दृश्य चंदगडाच्या रस्त्यावर दिसत होते. जणू चंदगडमध्ये प्रतिपंढरी साकारली होते. निमित होते पन्नासाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यानी काढलेल्या ग्रंथदिंडीने झाली पालखीचे पूजन मुख्याधापक एन. डी. देवळे यांनी केले.
वाचनाचे महत्व पटवून सांगण्यासाठी पालखी मध्ये ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या दिंडीमध्ये १५६ विद्यार्थी सहभागी होते. या ग्रंथदिंडीमध्ये गट शिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, केंद्र प्रमुख जगताप बहुसंखेने विद्यालयाचे अध्यापक सहभागी होते. या दिंडीचे नियोजन बी. आर. चिगरे, संजय साबळे, शरद हदगल यांनी केले.
No comments:
Post a Comment