पश्चिम बंगाल येथील राष्ट्रीय ॲथलॅटिक्स स्पर्धेत नरसिंग काबंळे यांना सुवर्णपदक - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2023

पश्चिम बंगाल येथील राष्ट्रीय ॲथलॅटिक्स स्पर्धेत नरसिंग काबंळे यांना सुवर्णपदक



चंदगड/प्रतिनिधी
मिदनापूर (पश्चिम बंगाल)  येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्य पदक मिळविल्याने महाराष्ट्र राज्याला उपविजेतेपद प्राप्त झाले आहे. ४×४००मिटर धावणे रिले मधे प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले ,१००००मिटरधावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक मिळवले,५०००मिटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक मिळविले त्यामुळे या तीन पदकाने महाराष्ट्र राज्याला देशात ऊप विजेतेपद मिळाले.नरसिंग काबंळे हे  मौजे कारवे ता.चंदगड येथील रहिवाशी असून सध्या ते पोलीस दलात कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. पोलीस दलात भरती होण्याआधी काबंळे यानी महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक येथील अनेक धावण्याच्या अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या.त्याना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,उपअधीक्षक जयश्री देसाई, गृह अधिक्षक प्रिया पाटील, राखीव निरिक्षक सत्यवान मासाळकर,क्रिडा प्रशिक्षक इमाम शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
नरसिंग च्या त्या घोषणेने स्पर्धा रोमचिंत...

मिदनापूर (पश्चिम बंगाल)  येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत संपूर्ण देशातील पोलीस दलातील खेळाडू सहभागी झाले होते.स्पर्धे सुरवात झाली त्यावेळी नरसिंग काबंळे यांनी बोला " छत्रपती शिवाजी महाराज की जय " अशी घोषणा देताच स्पर्धेतील खेळाडू अचंबित झाले. पुन्हा  सर्वानीच ही घोषणा दिल्याने अवघी स्पर्धाच शिवमय घोषणांनी दणाणून गेला.

No comments:

Post a Comment