जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत किटवाड शाळा प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2023

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत किटवाड शाळा प्रथमचंदगड/प्रतिनिधी
किटवाड (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेने  जि. प. कोल्हापूर अध्यक्ष चषक 2023 कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
   जिल्हास्तरीय वरिष्ठ गटातील कबड्डी स्पर्धेत किटवाड शाळेने प्रथम क्रमांक पटकावत  कबड्डी खेळातील जिल्हास्तरीय यशाची सलगता ठेवली. खेळाडू ज्ञानेश पाटील, प्रतीक रावजीचे ,रामलिंग जाधव, मानव पाटील, महेश पाटील, अमन खंदाळकर,आर्यन नरेवाडकर, श्रेयस लाड ,श्रेयश पाटील, अवधूत जाधव या खेळाडूनी यशस्वी कामगिरी केली. या विजयी संघाला शाळेचे मुख्याध्यापक व्ही.जे. अष्टेकर, अध्यापक जे. एम. अस्वले, श्रीकांत तारिहाळकर,डी.एल्.वांद्रे, के.जे .पाटील, सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .
   गटशिक्षणाधिकारी  सौ.एस. एस. सुभेदार ,कालकुंद्री केंद्राचे केंद्रप्रमुख बी.एच. प्रधान यांनी विजयी संघाचे कौतुक केले.किटवाड ग्रामपंचायत, अमर सेवा सोसायटी, शाळा व्यवस्थापन समिती यासह,गावातील विविध संस्था, तरुण मंडळे व ग्रामस्थांनी  कौतुक केले.
      या स्पर्धेसाठी खेळाडूना लक्ष्मण मारुती पाटील यांनी चार हजार रुपये तसेच इतर ग्रामस्थ व संस्थांनीही अर्थिक सहकार्य केले.No comments:

Post a Comment