देवरवाडी येथील वैजनाथ देवालयात शनिवारी महाशिवरात्री उत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2023

देवरवाडी येथील वैजनाथ देवालयात शनिवारी महाशिवरात्री उत्सव
चंदगड/प्रतिनिधी
देवरवाडी (ता. चंदगड) येथील 
वैजनाथ देवालय येथे १८ फेब्रु. ला महाशिवरात्री उत्सव माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीतिथीला दि १८ फेब्रु,२०२३ रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होत असून नूतन स्थानिक सल्लागार उपसमिती कडून याचे मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू आहे.१७ फेब्रुवारी मध्य रात्री १२ वा. पासून सकाळीं ५.३० वाजे पर्यंत अभिषेक कार्यक्रम होइल. त्यानंतर महाशिवरात्री शुभारंभ सुरू होवून रात्री याम पूजा झाल्यावर मध्यरात्री १२ वा महाशिवरात्र समाप्ती होईल. रविवार १९ फेब्रुवारी ला महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी दु.१२ ते ४ वाजे पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाशिवरात्री उत्सवाची सांगता होईल. सीमाभागासह, पंचक्रोशितील भाविक भक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नूतन वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती कडून करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment