पै.विष्णु जोशीलकर यांच्या त्या कुस्तीला ३७ वर्षे पुर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2023

पै.विष्णु जोशीलकर यांच्या त्या कुस्तीला ३७ वर्षे पुर्ण

पै. विष्णु जोशीलकर

चंदगड / नंदकुमार ढेरे
चंदगडसह संपुर्ण राज्याचा नावलौकिक वाढवलेल्या पै.विष्णु जोशीलकर यांना २३ व्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेल्या त्या कुस्तीला १२ फेब्रुवारी २०२३ रोजी तब्बल ३७ वर्ष पुर्ण झाली.त्यानिमित पै.जोशीलकर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा........

किणी (ता. चंदगड) या छोट्याशा गावात शेतकरी कुटूबांत जन्मलेल्या विष्णु जोशीलकर याना लहानपणापासून कुस्तीची आवड होती.महाविद्यालयात असताना त्यानी अनेक चटकदार कुस्त्या केल्या होत्या.तो नेहमी स्पर्धेसाठी कुस्ती खेळत नाही तर ' कुस्तीसाठी ' कुस्ती खेळतो . तो आपल्या कुस्तीच्या डावानी कुस्तीशौकिनांवर एक वेगळी मोहिनी घालतो . आपल्या कुस्तीने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो . त्याचं हे कुस्तीक्षेत्रातील वाढतं यश पाहून दौलत सहकारी साखर कारखान्याने त्याला दत्तक घेतले . शिवाय महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने कोल्हापूर कार्यालयात त्याला नोकरी दिली. पै.विष्णूनं १९८६ साली  पुण्याजवळ पिंपरी चिंचवड  येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगणावर झालेल्या महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेच्या तिसाव्या अधिवेशनामध्ये राज्यस्तरावरील पार पडलेल्या कुस्ती सामन्यात कोल्हापूरच्याच ' काळाइमाम ' तालमीच्या रामा मानेवर वीस मिनिटांच्या नाट्यमय लढतीनंतर विजय मिळवून ' महाराष्ट्र केसरी ' पदाची चांदीची गदा जिंकून .. कोल्हापूर जिल्हयाच्या कुस्तीपरंपरेत व लौकिकात भर घालून कुस्ती क्षेत्रात उंच भरारी मारली . यापूर्वी १ ९ ७४ साली मोतीबाग तालमीचा युवराज पाटील ' महाराष्ट्र केसरी'चा मानकरी ठरला होता . त्यानंतर तब्बल अकरा वर्षांनी पुन्हा एकदा मोतीबाग तालमीच्या विष्णू जोशीलकरनं ' महाराष्ट्र केसरी'चा बहुमान संपादून साखर कारखाना व वीज मंडळाचा विश्वास सार्थ ठरवला.महाराष्ट्र केसरी च्या गदेसह पै.जोशीलकर यांची कोल्हापूर शहरात उत्साही मिरवणूक  काढण्यात आली होती . त्याच्या या विजयामुळे १ ९ ७४ नंतर ११ वर्षांनी पुन्हा एकदा मोतीबाग तालमीचा मल्ल ' महाराष्ट्र केसरी ' झाला आहे . यापूर्वी मोतीबागचा युवराज पाटील ७४ साली महाराष्ट्र केसरी झाला होता . तर या पदाचा माने कोल्हापूरला गेली चार वर्षे सलग मिळत आहे . पै . युवराज पाटील , हिंदकेसरी गणपतराव आंदळकर , दादू चौगुले , वसंतराव मोहिते , ॲड.जे जे .बारदेसकर , भिकशेठ पाटील , जी . डी . पाटील यासह नागरिक व अनेक पैलवान या मिरवणुकीत सहभागी झाले होते,तर तक्तालीन महापौर धोंडीरामं रेडेकर , विरोधी पक्षनेते मारुतराव जिरगे यानी त्याचे महापालिकेसमोर पुष्पहार घालून अभिनंदन केले होते. दौलत साखर कारखान्यातर्फे पै.जोशीलकर याना मासिक पाचशे रुपये मानधन दिले जाते होते.तर त्यांच्या यशाने प्रेरीत होऊन पेठचे नाना महाडीक यानी त्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले होते.
महाराष्ट्र केसरी विष्णू तात्या जोशीलकर यांना महाराष्ट्र केसरी होण्याला ३७ वर्ष पूर्ण झाली.या मानाच्या गदेसाठी ते सात वर्षे झटत होते.१९७९ साली  केवळ एका गुणांनी पराभव झाला होता.१९८०, व १९८१ साली गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश करून देखील पराभव झाला.त्यानंतर सलग दोन वर्षे गुडघ्याच्या दुखापतीमुळे ते खेळू शकले नाहीत.८४ ला ते खेळे पण या वर्षी देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

        दिल्लीत ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी कंट्रोल बोर्डाच्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी भाग घेतला त्यात अंतिम कुस्ती सात वेळ पंजाब केसरी असणारे सलविंदर सिंग यांच्या बरोबर होता.कुस्ती सुरू असताना दोघे ही पैलवान चार फूट आखाड्यावरून खाली पडले होते तेव्हा विष्णू तात्या यांचा खांदा जॉईंट मधून निखळला होता. याच वेळी  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्ध्या असल्यामुळे ते विमानांनी पुण्याला आले होते.आणि त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घेतला.यात त्यांनी सांगलीच्या बाळू मुल्ला ,औरंगाबाद चे इस्माईल पठाण यांच्या वर विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.अंतिम सामना कोल्हापूर च्या काळाईमाम तालमीत पैलवान रामा माने यांच्या शी होता त्यात विष्णू तात्यांनी रामा माने याना ४-०अशी मात दिली.आणि विष्णू तात्या २३ व्या महाराष्ट्र केसरी गदेचे मानकरी झाले.

 राजश्री शाहूमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत विष्णू  मोतीबाग तालमीत गणपत आंदळकरसारख्या मुरब्बी वस्तादाच्या मार्गदर्शनाने वाढले . शिवाय दौलत साखर कारखान्याचे अध्यक्ष कै. नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांनी त्याला योग्य वेळी सहकार्य दिले. आजच्या वाढत्या महागाईत कुस्तीची परंपरा जपणे हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे . पूर्वी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत कुस्तीला राजाश्रय होता . त्यावेळी मल्लांना शाहूमहाराजांकडून भरपूर मदत मिळायची.सध्या  कुस्तीला लोकाश्रय मिळालाय पण पैलवानांना पैसाश्रय मिळालेला नाही . सध्या पैलवानास महिन्याकाठी कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येतो . यासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्यासाठी पैलवानांना पगाराच्या नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत . तसेच पैलवानातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी वर्षातून किमान पाच - सहा वेळा 
' कुस्ती स्पर्धा ' आयोजित करून पैलवानांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे . तसेच राज्य कुस्तीगीर परिषदेनेही पैलवानांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे.   चार ते सात फेब्रुवारी  १९ ८४ अखेर दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय वीजमंडळ कुस्ती स्पर्धेत विष्णूने पंजाबच्या बलविंदर सिंगला चितपट हरवूनही विष्णूवर पंचमंडळीकडून अन्याय केला गेला व त्याला नाइलाजास्तव सुवर्णपदकाऐवजी कास्यपदकावरच समाधान मानावे लागले . कुस्तीची परंपरा जपण्यासाठी कुस्ती क्षेत्रात प्रामाणिकपणे निष्पक्षपातीपणे वागणाऱ्या पंचांची आज प्रकर्षाने कमतरता जाणवत आहे . जिकडेतिकडे पाकिस्तानी पंचांचे शिष्य उदयाला येत आहेत , ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे . विष्णू जोशीलकरने ८२ किलोगटामध्ये ' महाराष्ट्र चॅम्पियन'चा बहुमान यापूर्वी दोनदा मिळवला आहे . पैलवान शंकर तोडकरबरोबर झालेल्या कुस्तीत तो विजयी झाला आहे , तर राजा माने व चंद्र करविनकोप यांच्याबरोबरही त्याच्या मैदानी कुस्त्या होऊन तो बरोबरीने लढला आहे.आजची तरुणाई व्यसनाधीन होऊन कुस्तीकडे पाठ फिरवत असल्याची खंत व्यक्त करून चंदगड तालुक्यात नामवंत मल्लांचे मोठे कुस्ती मैदान भरवण्याचा मानस यावेळी पै.विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केला.



No comments:

Post a Comment