सुमन यमगेकर यांचे निधन त्यांनी केले नेत्रदान ! - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2023

सुमन यमगेकर यांचे निधन त्यांनी केले नेत्रदान !


आजरा  / सी. एल. वृतसेवा  
उत्तूर (ता. आजरा) येथील सुमन गणपतराव यमगेकर (वय ६०) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. उत्तूरमधील हे दुसरे नेत्रदान आहे. दु:खद प्रसंगीही यमगेकर कुटुंबीयांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होते.
गडहिंग्लज तालुक्यातून सुरु झालेल्या नेत्रदान चळवळीचा विस्तार आजरा तालुक्यातही होत आहे. उत्तूरमध्ये यापूर्वी मधुकर पोकळे यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. तर आजरा तालुक्यातील सरोळी, मडिलगे या गावातून चार व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.    
          सुमन यमगेकर यांना सकाळी  हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथे आणले होते. पण, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. यमगेकर कुटुंबीयांनी दहा वर्षांपूर्वीच नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यामुळे सुमन यांचे नेत्रदान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. येथील अंकूर आय बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर अंकूरच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. चळवळीत गेल्या आठवडाभरात झालेले हे दुसरे नेत्रदान आहे.
सुमन यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता व गडहिंग्लज स्टोन क्रशर असोसिएशनचे माजी अध्यक्ष गणपतराव यमगेकर यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.१६) सकाळी नऊला आहे.No comments:

Post a Comment