कालकुंद्री येथे अपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2023

कालकुंद्री येथे अपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी

शिवज्योत आणताना युवक

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

      कालकुंद्री (ता. चंदगड) येथे कुळवाडी भूषण, रयतेचे राजे,  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव अपूर्व उपसाहात साजरी करण्यात आली. मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने स्वराज्याचे सरसेनापती प्रतावराव गुर्जर यांच्या नेसरी- कानडेवाडी येथील स्मारकावरून शिवज्योत आणण्यात आली. 

महिला पाळणा गीते गाताना

       सकाळी गावातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन सरपंच छाया जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील संगीता कोळी, मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, शिवप्रेमी ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी पाळणा गीते गायिल्यानंतर वाद्यवृंद व सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या गजरात गावातून शोभायात्रा व शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युद्ध कला प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

No comments:

Post a Comment