इब्राहिमपुर येथे आग लागून लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2023

इब्राहिमपुर येथे आग लागून लाखोंचे नुकसान

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    इब्राहिमपुर (ता. चंदगड) येथे काल लागलेल्या आगीत शेतकर्‍यांच्या गवत गंज्या, काजु झाडे, पाईप लाईन, करडी गवत (पयान)बांधावरचे शोले आदीसह इतर पिके जळून शेतकऱ्यांचे अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाले. तहसिलदार विनोद रणवरे यांनी जळीतग्रस्त भागांची पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

     अनंत दत्तात्रय देसाई, सुभाष कृष्णा देसाई, अनंत गणपत गावडे, गोपाळ महादेव गावडे, लक्ष्मण भातकांडे, रघुनाथ भातकांडे, मारूती भातकांडे, विठोबा हरेर, विलास बागडी, लक्ष्मण बागडी आदीसह शेतकर्‍यांचे ३००एक्कर क्षेत्र जळून खाक झाले. या जळीतग्रस्त शेतातूनच विद्युत लाईन गेल्याने शाॅर्टसकिॅटने ही आग लागल्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंचनामे  करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त  शेतकरी वर्गातून होत आहे.No comments:

Post a Comment