पी. एम. किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे २७ फेब्रुवारीला वितरण होण्याची शक्यता - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2023

पी. एम. किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे २७ फेब्रुवारीला वितरण होण्याची शक्यता



कोल्हापूर / (जिमाका):- 

        पी. एम. किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी, 2023 रोजी होण्याची शक्यता आहे. योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आधार सिडींग प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबी (इंडीयन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये भारतीय डाक विभागाच्या मार्फत उघडण्यात येत आहेत. प्रलंबित लाभार्थीची बॅंक खाती आयपीपीबी (इंडीयन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये नव्याने उघडल्यावर पुढील ४८ तासांत ती आधार संलग्न होऊन सक्रिय होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा पी. एम. किसान योजनेचे नोडल अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

        कोल्हापूर जिल्ह्यातील पी. एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थांनी पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबी (इंडीयन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये उघडण्यात यावीत. म्हणजे कोणताही लाभार्थी पी. एम. किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment