उतूरच्या कुस्ती स्पर्धेत उत्तरेश्वर केसरी किताबाचा मानकरी पंढरपूरचा पै. महारुद्र काळे, पन्हाळाच्या संग्राम पाटील यांना केले चितपट ! छ. युवा ग्रुपच्या वतीने शिवजंयती निमित्त कुस्तीचे आयोजन ! - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2023

उतूरच्या कुस्ती स्पर्धेत उत्तरेश्वर केसरी किताबाचा मानकरी पंढरपूरचा पै. महारुद्र काळे, पन्हाळाच्या संग्राम पाटील यांना केले चितपट ! छ. युवा ग्रुपच्या वतीने शिवजंयती निमित्त कुस्तीचे आयोजन !

पै. महारुद्र काळे

आजरा  / सी. एल. वृतसेवा 

        छ. युवा ग्रुप उत्तूर (ता. आजरा) यांच्यावतीने आयोजित शिवजयंती निमित्ताने उत्तूर येथील केंद्रशाळेच्या मैदानावर  निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान घेण्यात आले. या स्पर्धेत केसरी किताबाचा मानकरी पंढरपूरचा पै. महारुद्र काळे ठरले तर पन्हाळाच्या संग्राम पाटील या सेना दलाच्या पैलवानाला चितपट केले. एकूण ७५ मल्लांनी कुस्तीत सहभाग घेऊन उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

उत्तूर ता .आजरा . येथील कुस्ती स्पर्धेतील महारुद्र काळे व संग्राम पाटील यांचे तील लढत

               छ. युवा  ग्रुपच्या वतीने शिवजंयती सोहाळा मोठ्या उतसाहात साजरा केला जातो. यावर्षी प्रथमच युवा ग्रुपने कुस्ती स्पर्धा भरवल्या होत्या . त्यास कुस्तीपटूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांसाठी प्रथम घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. वैष्णवी कदम व सिद्धी कांबळे या महिला पैलवान जिंकल्या. महाराष्ट्रासह कर्नाटक, हरियाणा राज्यातील पैलवानांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पंच म्हणून बाजीराव दिवटे, राम शिंदे, शिवाजी सुर्वे यांनी काम पाहिले.

विजेता महारुद्र काळे यांना मानाची गदा देताना युवा ग्रुप कार्यकर्ते व ग्रामस्थ .

           उतूर नव्याने  सुरु होणाऱ्या तालमीचे भूमीपूजन राष्ट्रकूल स्पर्धेचे पारितोषिक  विजेते राम सारंग यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मडळांचे संस्थापक योगेश भाईगडे, अध्यक्ष राहूल कुरुणकर, उपाध्यक्ष सुमित किल्लेदार, आनंदा जावळे, अवधूत इळके, प्रमोद गुरव, प्रसाद चव्हाण, वैभव भाईगडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment