ध्येय निश्चितिसाठी परिस्थिती आड येत नाही - डॉ . बी डी सोमजाळ - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2023

ध्येय निश्चितिसाठी परिस्थिती आड येत नाही - डॉ . बी डी सोमजाळ

मार्गदशन करताना तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालूक्यात गुणवत्तेची खाण आहे. पण ग्रामिण भागातील विद्यार्थी परिस्थितीचे रडगाने गात आहेत. एकदा ध्येय निश्चित झाले की यश मिळवताना परिस्थिती आड आणू नये असे विचार चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. जी. सोमजाळ यांनी व्यक्त केले.
     श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे इयत्ता १० वी १२ वी विद्यार्थ्याना परिक्षेला सामोरे जाताना - ताण तणावातून मुक्ती या विषयावर डॉ. सोमजाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी होते.
डॉ . सोमजाळ पुढे बोलताना म्हणाले , ध्येय गाठताना नुसते चालून चालत नाही तर ते साध्य होईपर्यंत पळावे. मोबाईलचे  वेड लावून घेऊन वेडे होण्यापेक्षा यश मिळवण्याचे वेड बाळगा. गैर मार्गांचा अवलंब न करता कष्टाने मिळवलेल्या यशाला सोनेरी झळाली लाभते . तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परिक्षेला सामोरे जाऊन शाळेचे नाव उज्वल करावे असे सांगून यश कितीही मिळाले तरी आईवडीलांना न विसरण्याचा सल्ला डाँ . सोमजाळ यानी दिला .
या कार्यक्रमाला आरोग्य सहाय्यक एम . के . गुळवणी , टी  . जे . क्षीरसागर , प्रा . एम .पी . पाटील , एस के . पाटीत आदि मान्यवर उपस्थित होते . प्रास्ताविक प्रा रामदास बिर्जे यानी केले आभार एस .एन . पाटील यांनी मानले.


No comments:

Post a Comment