बसर्गे शाळेच्या निधीचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत डबल धमाका - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2023

बसर्गे शाळेच्या निधीचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत डबल धमाका

स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर ट्रॉफी व प्रशस्तीपत्रासह निधी बेनके.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   कुमार विद्यामंदिर बसर्गे शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी निधी निवृती बेनके हिने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक शालेय क्रीडा स्पर्धेत डबल धमाका करत ५० व १०० मीटर धावणे कनिष्ठ गट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तिचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अशा उबाळे व मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. तिला मुख्याध्यापक भरमू तारिहाळकर वर्गशिक्षक शाहू पाटील, दयानंद  कदम, शिल्पा तुर्केवाडकर, निवृत्ती तुकाराम बेनके आदींचे मार्गदर्शन तर केंद्रप्रमुख एन व्ही पाटील, शाळा व्य कमिटी बसर्गे आदींचे प्रोत्साहन लाभले.



No comments:

Post a Comment