चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शनिवारी त्रैवार्षिक अधिवेशन - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2023

चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शनिवारी त्रैवार्षिक अधिवेशनकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन उद्या शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.१५ वाजता महादेवराव वांद्रे विद्या संकुल तुर्केवाडी फाटा येथे संपन्न होणार आहे.

       आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार, महाराष्ट्र एज्युकेशन संस्था अध्यक्ष महादेवराव वांद्रे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक संघ तालुकाध्यक्ष रमेश हुद्दार, सरचिटणीस दस्तगीर उस्ताद, कोशाध्यक्ष परशराम नाईक, कार्याध्यक्ष शाहू पाटील आदींनी केले आहे.No comments:

Post a Comment