नागनवाडी येथील धनंजय विद्यालयात सावित्रीबाई फुले गटाच्या पाक्षिकाचा समारोप - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2023

नागनवाडी येथील धनंजय विद्यालयात सावित्रीबाई फुले गटाच्या पाक्षिकाचा समारोप

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय विद्यालयात तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेजच्या सावित्रीबाई फुले गट क्रमांक १ यांचा पाक्षिक भाग २ चा समारोप पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. आर. सप्ताळे होते. 

        ग. गो. प्रधान यांनी बेस्ट कसे बनावे? या विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य एन. जे. कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल भोसल यांनी केले. मनोज जांबोटकर, पुंडलिक गावडे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन सौ. ऋतुजा पाटील व आभार सौरभ पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन विनायक गावडे, सुरेश कांबळे व जयेंद्र नाईक यांनी केले. 

No comments:

Post a Comment