ईनाम म्हाळुंगे येथून ऊसतोड महिला बेपत्ता, चंदगड पोलिसात तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2023

ईनाम म्हाळुंगे येथून ऊसतोड महिला बेपत्ता, चंदगड पोलिसात तक्रार

 

सौ. विदया कैलास पवार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

ईनाम म्हाळुंगे (ता. चंदगड) येथून गुरुवारी रात्री सौ. विदया कैलास पवार (वय वर्ष २६ मुळ गाव दत्तापुर पो. डावरगाव ता. सिंदखेड, जि. बुलढाणा पि.नं.४४३२०३, सध्या रा. ईनाम म्हाळुगे ता. चंदगड जि. कोल्हापुर) ही विवाहिता बेपत्ता  झाल्याची तक्रार पती कैलास पवार यानी चंदगड पोलिसात दिली आहे. 

    याबाबत पोलिसातून मिळालेली माहीती अशी की ऊस तोड करणारे पवार  दाम्पत्य हे म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील संतोष गावडे यांच्या शेतातील झोपडीत तात्पुरते राहत होते. काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सौ.विद्या ही नैसर्गिक विधी साठी बाहेर जाते असे पतीला सांगुन बाहेर निघुन गेली. बराच वेळ झाला पत्नी घरी आली नाही म्हणून पती कैलास याने नातेवाईकांना सोबत घेऊन परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळुन न आल्याने  चंदगड पोलिसात तक्रार दिली. अंगाने सडपातळ, रंग-गव्हाळ, चेहरा लांब, कपाळ-मोठे/रूंद, नाक-लांब टोकदार, डोळे काळे लाहान, केस काळे अखुड, अंगात निळया रंगाची साडी, गळ्यात - मंगळसूत्र, कानात टॉप्स, पायात जोडवी, पांढऱ्या रंगाची चप्पल, नाकावर तिळ, उजव्या हातावर अंकुश नावचे गोंदण, असून ती बंजारा, मराठी, हिन्दी भाषा बोलते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास चंदगड पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस नाईक महापूरे करीत आहेत.
No comments:

Post a Comment