बाळासाहेबांची शिवसेना शेतकरी सेवा संघटनेच्या चंदगड तालुका प्रमुखपदी संतोष फडके यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

बाळासाहेबांची शिवसेना शेतकरी सेवा संघटनेच्या चंदगड तालुका प्रमुखपदी संतोष फडके यांची निवड

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          बाळासाहेबांची शिवसेनेच्या चंदगड तालुका शेतकरी सेवा संघटनेच्या तालुका प्रमुख पदी संतोष बाळाराम फडके (रा. माणगाव) यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर येथे खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यालयात निवडीचे पत्र युवा नेते विरेन्द्र मंडलिक यांच्या हस्ते देण्यात आले. 

      या वेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील, बाबू नेसरकर, तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगीरे, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, तुलशिदास जोशी, मनोहर पाटील, नागेश नौकुडकर, मिथुन पाटील, जय महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे तालुकाप्रमुख एकनाथ गुरव, कागल तालुका प्रमुख सुधीर पाटोळे, उपतालुकाप्रमुख दत्ता पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख किरण कोकीतकर, ओ बी सी सेलचे तालुका प्रमुख मारूती पाथरुट, नाईक समाज तालुका प्रमुख शिवाजी नाईक, वाहतूक सेना उपतालुकाप्रमुख सलिम मुल्ला, कामगार सेना तालुकाप्रमुख दिपक पवार, पुडलिक पाटील, प्रकाश बागडी,धनाजी गुरव व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment