तावरेवाडी येथीलं मंगाईदेवी मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

तावरेवाडी येथीलं मंगाईदेवी मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        तावरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री मंगाई देवी मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

     सोमवारी सकाळी देवापा दत्तू कागणकर मुहूर्तमेढ तर प्रसाद संभाजी कागणकर, काशिनाथ कागणकर यांच्या हस्ते तर मूर्ती अभिषेक व विधिवत पूजा कुमार तुकाराम पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सोमवारी एम. पी. पाटील (करवीर) यांचे प्रवचन तर रात्री सोमनाथ महाराज लामखणे (इचलकरंजी) यांचे कीर्तन मंगळवारी विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व रात्री भगवताचार्य वासुदेव गुरव यांचे प्रवचन होणार आहे. बुधवारी सकाळी पालखी पूजन, गंगा पूजन, महाआरती त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रदाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ व मंदिर जीर्णोद्धार कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment