प्रभाकर कांबळे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

प्रभाकर कांबळे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

         

प्रभाकर कांबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         विक्रोळी येथील गुणवंत कामगार व  समाजसेवक, वनिता फाउंडेशन चे संस्थापक, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रभाकर तुकाराम कांबळे यांची सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन तर्फे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या वतीने' विशेष कार्यकारी अधिकारी 'पदी निवड करण्यात आली. 

      काबंळे याना निवडीचे प्रमाण पत्र व ओळख पत्र देण्यात आले असून दिनांक ८/२/२०२३ ते १०/५/२०३९ पर्यंत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा" गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार" प्राप्त व्यक्तींना वयाच्या ७० वर्षा पर्यंत कालावधीसाठी देण्यात आले आहे.'विशेष कार्यकारी अधिकारी पदावर निवड केल्याने श्री. काबंळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment