देवरवाडी येथील मारुती गल्लीच्या नामफलकाचे अनावरण - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

देवरवाडी येथील मारुती गल्लीच्या नामफलकाचे अनावरण

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         देवरवाडी (ता. चंदगड) गावची वस्ती वसवल्यापासून प्रमुख गल्ल्यापैकी एक असणारी आणि वैजनाथ मंदिर कडे जाणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या  मारुती गल्ली च्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

     मारुती गल्लीमधील एमजी बॉईज (मारुती गल्ली बॉइज्) यांच्या पुढाकाराने या फलकाची व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती.

      शिवजयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी किल्ले सामानगड येथून शिवज्योत आणून फलकाचे उद्घाटन गल्लीतील ज्येष्ठ व्यक्ती, आजी -माजी सैनिक, तसेच ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, गावातील विविध समित्यांचे पदाधिकारी व गल्लीतील रहिवासी महिलावर्ग युवक तसेच बालचमु यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण संपन्न झाले. गल्लीतील मुलींनी विशेष पेहराव करून ज्योतीचे स्वागत तसेच हाती भगवे झेंडे घेऊन मिरवणूक काढली.  

No comments:

Post a Comment