बागायतदार उत्तूर परिसर हिरवाईन नटलेला बघायचे आहे, आंबेओहोळच्या पाण्याचा पुरेपूर वापर करा : आम. हसन मुश्रीफ - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

बागायतदार उत्तूर परिसर हिरवाईन नटलेला बघायचे आहे, आंबेओहोळच्या पाण्याचा पुरेपूर वापर करा : आम. हसन मुश्रीफ

उत्तूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या कामास सुरुवात



आजरा / सी. एल. वृतसेवा 

           आंबेओहोळ प्रकल्पात पाणी साठा झाला असून पाणी योजना राबवून बागायतदार उत्तूरकर बघायचे आहे. यासाठी पाण्याचा पुरेपूर वापर करायला हवा यासाठी संताजी घोरपडे कारखाना मदतीसाठी सदैव तयार आहे असे प्रतिपादन  (उत्तूर, ता. आजरा) जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आम. हसन मुश्रीफ यांनी बोलताना केले. 

              आम मुश्रीफ म्हणाले, कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नांमुळे उतूर प्रादेशिक नळपाणी योजना झाली ही  योजना  चिकोत्रा नदी पात्रातून राबवली गेली. १५ कि. मी. अंतरावरून पाणी येत असल्याने टाकी भरण्यास विलंब व वीज बिल अधिक येत होते. त्यामुळे आंबेओहोळ प्रकल्पातून ही योजना मंजूर करून घेतली. ५० वर्षे टिकेल असे दर्जदार काम होणार आहे.

       वसंत धुरे म्हणाले, ही योजना महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना योजना आम. मुश्रीफ यांनी मंजूर करून आणली.या योजनेमुळे उत्तूरचा पाणी प्रश्न संपुष्टात येणार आहे. आंबेओहोळ प्रकल्पातून पाणी योजना होत असल्याने पाणी मुबलक पाणी स्वच्छ व मुबलक प्रमाणात मिळणार आहे.

              उपसरपंच समिक्षा देसाई , वसंत धुरे ,  उमेश आपटे , ,मारुती घोरपडे , काशिनाथ तेली , वैशाली आपटे , बी टी जाधव , सुनिल दिवटे , गंगाधर हराळे , संजय गुरबे , गणपती सांगले , बी टी जाधव , दिपक देसाई ,भैरु सावंत , संभाजी तांबेकर , महादेव पाटील , बबन पाटील  , सुधीर सावंत , डॉ प्रकाश तौकरी . शिवलिंग सन्ने , राजू खोराटे , महेश करंबळी , दत्तात्रय केसरकर , दत्ता इळके , शशिकांत लोंखडे   आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत सरपंच किरण आमणगी यांनी केले. आभार शिरीष देसाई यांनी मानले.

No comments:

Post a Comment