चंदगड येथील लिटल ॲजल किंडर गारटेन स्कुलचे सोमवारी वार्षिक स्नेहसंमेलन - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

चंदगड येथील लिटल ॲजल किंडर गारटेन स्कुलचे सोमवारी वार्षिक स्नेहसंमेलनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            चंदगड येथील रॉयल शेफर्ड शिक्षण संस्था संचलित लिटल ॲजल किंडर गारटेन स्कुलच्या वतीने सोमवारी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी ४ वाजता चंदगड येथील रवळनाथ मंदिर हॉलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्याची माहीती प्राचार्या सौ. अनिता काजिर्णेकर यांनी दिली.

     प्रमुख पाहण्या म्हणून चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर व तहसिलदार विनोद रणवरे यांच्यासह चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर व हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. हणमंत गावडे उपस्थित रहाणार आहेत. स्कुल व्यवस्थापन, कर्मचारी व विद्यार्थांच्या वतीने या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक दिपक काजिर्णेकर यांनी केले आहे.No comments:

Post a Comment