कोवाड महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2023

कोवाड महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

मराठी राजभाषा दिना निमित्य बोलताना प्राचार्या डॉ. एम . एस . पवार

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथील मराठी  विभागाने  मराठी राजभाषादिन प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार होत्या. 

        प्रास्ताविक डॉ. सुनीता कांबळे यांनी केले. स्वागत डॉ. आर. डी. कांबळे यांनी केले. प्रारंभी कुसुमांग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे आणि शिवप्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. आर. डी. कांबळे हे 'मराठी भाषा आणि संस्कृती' या विषयी मार्गदर्शन करतांना म्हणाले ,आजची पिढी लेखन, वाचन संस्कृती पासून दूर जात आहे. आपल्या परिसरातील साहित्यिक स्वामीकार् रणजित देसाई यांचा साहित्यिक  वारसा असाच पुढे नेण्यासाठी आपण सजग राहून लेखनाकडे वळावे तरच भाषेला सन्मान मिळेल. तरच राजभाषेची अस्मिता जपून तिला वैश्विक स्तरावर पोहचवता येईल. त्यासाठी आपणास आजूबाजूचे समाजभान असणे आवश्यक आहे. त्यानंतर बी. ए. 3 च्या कु. ऋतुजा पाटील हिचे मराठी राजाभाषा आणि तिचे महत्व यावर मनोगत झाले. 

        प्राचार्य डॉ. एम. एस.पवार म्हणाल्या, कोणत्याही भाषेचा दुस्वास न करता आपल्या भाषेचा अभिमान आणि सन्मान  करावा, राजभाषा दिन साजरा होत असताना  तरुण पिढीने आपल्या साहित्य परंपरा, नव नवे विचार प्रवाह आणि त्यातील जाणीवाचा शोध घेत राहून आपल्या भाषेचा सन्मान केला तरच आपली मराठी राज भाषा संवर्धित राहीलआणि तिची उंची वाढेल.

          यावेळी सुरुवातीला 'शब्दवेल' या भितीपत्रकाचे प्रकाशन  डॉ. एम. एस. पवार, प्रा. एस. जे. पाटील, डॉ.व्ही.आर पाटील, प्रो. डॉ. ए. के. कांबळे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, प्रश्न मंजुषा ,हस्ताक्षर लेखन ,आणि निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.ए.एस.आरबोळे,  डॉ. बी. एस. पाटील, प्रा. आर. टी. पाटील, डॉ. व्ही. के. दळवी, डॉ. के. एस. काळे, डॉ. के. पी. वाघमारे, डॉ. दीपक पाटील, प्रा. मुकेश कांबळे, डॉ. व्ही. आर. पाटील, प्रा. एस. जे. पाटील, डॉ. ए. के. कांबळेआदी सर्व् विद्याशाखेंचे प्रमुख प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी,आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीप मुंगारे आभार डॉ. दीपक पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन  मराठी विभागाने  केले होते.

No comments:

Post a Comment