ध्येयनिष्ठ माणसेच जीवनात यशस्वी होतात - एस. आर. देशमुख, दहावी विद्यार्थांचा निरोप समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2023

ध्येयनिष्ठ माणसेच जीवनात यशस्वी होतात - एस. आर. देशमुख, दहावी विद्यार्थांचा निरोप समारंभ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           "माणसाला श्वासा इतकीच ज्ञान मिळवण्याची आस असली पाहिजे. जीवनात आई-वडील व गुरु यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे .त्यांच्या ऋणातच जीवनाचे सार्थक आहे. आयुष्यात कधीही आई-वडिलांना अंतर देऊ नये. व्यसनांच्या आहारी जाऊ नये. जीवनात खूपच परिश्रम करून यशस्वी झालेल्या व्यक्तींचे आदर्श बाळगा. त्यांचे कार्य नजरेसमोर ठेवून वाटचाल करावी.ध्येय निष्ठ माणसेच जीवनात यशस्वी होतात " असे प्रतिपादन माजी प्राचार्य एस. आर. देशमुख यांनी केले. ते दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील  इ दहावी विद्यार्थांच्या शुभेच्छा समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक एन. डी. देवळे होते. 

         प्रास्ताविक वृषाली झेंडे हिने केले. पाहुण्याचा परिचय एम. व्ही. कानूरकर यांनी करून दिला. यावेळी क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जान्हवी आनंदाचे, मंदार गायकवाड, पार्थ बल्लाळ या विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले. टी. टी. बेरडे, संजय साबळे, बी. आर. चिगरे, सचिन शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

       कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर, प्रा. बी. डी. मोरे, जे. जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे, डी. जी. पाटील, पी. एच. सुतार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. श्रध्दा कानूरकर, दिपा हिरेमठ यांनी तर आभार तेजस्विनी कांबळे हिने मानले.



No comments:

Post a Comment