केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून चंदगडच्या विकासाला प्राधान्य देणार, ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन, इनाम सावर्डे येथील महाआरोग्य शिबिरालाही मोठा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2023

केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून चंदगडच्या विकासाला प्राधान्य देणार, ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन, इनाम सावर्डे येथील महाआरोग्य शिबिरालाही मोठा प्रतिसाद

इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी लाभार्थींशी संवाद साधला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, शिवाजीराव पाटील व मान्यवर उपस्थित होते.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        काँग्रेस सरकारला जे ७० वर्षात जमले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ नऊ वर्षात केले असून येत्या काळातही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून चंदगडच्या विकासालाही प्राधान्य देणार असून तुम्हीही तालुका भाजपमय करण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे सोमवारी तालुका भाजपच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करून केंद्रीय योजनांच्या लाभार्थींशी त्यांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील होते. 

         प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले. केंद्रीय मंत्री सिंधिया पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना, आवास योजना, उज्ज्वला गॅस, अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला आहे. त्यामुळे कोराना काळातही देशाची अर्थव्यवस्था भक्कम ठेवण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोराना सारख्या नैसर्गिक आपत्तीतही ८० कोटी लोकांना मोफत धान्य त्यांनी पुरविले असून आता आपला देश निर्यातदार बनविला आहे. 

        तत्पूर्वी स्वागत करताना शिवाजीराव पाटील म्हणाले की, ``ना साखर कारखाना, ना शिक्षण संस्था ना वारसा तरीही माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व सर्वसामान्यांनी दिलेल्या मतांमुळे जबाबदारी वाढली असून यापुढेही अहोरात्र कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.``  

       तत्पूर्वी महाआरोग्य शिबिरात मोठा प्रतिसाद मिळाला त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.‌ यावेळी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ, दिपक पाटील, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अधिकारी मंगेश चिवटे, तालुका महिला आघाडी अध्यक्षा समृध्दी काणेकर, ज्योती पाटील, सुनिल काणेकर, गणेश फाटक, रविंद्र बांदिवडेकर, शांताराम पाटील, अंकुश गवस, अशोक कदम उपस्थित होते.‌ सूत्रसंचालन अनिल शिवनगेकर यांनी केले तर मायाप्पा पाटील यांनी आभार मानले. 


नेत्यापेक्षा चंदगडला जनसेवक लाभला  

        नेतेलोक निवडणूक आली की आश्वासन देऊन आपली पोळी भाजून घेतात. पण भर उन्हातही सर्वसामान्यांसाठी शिवाजीराव पाटील यांची तळमळ उल्लेखनीय असून तुमचे भाग्य आहे की, आश्वासनांच्या थापा मारणाऱ्या नेत्यापेक्षा काम करणारा जनसेवक तुम्हाला मिळाला असून त्यांच्या पाठीशी रहा, असे आवाहन करण्यासही मंत्री सिंधिया विसरले नाहीत.

No comments:

Post a Comment