'अक्षरलिपी' ग्रंथ साहित्य प्रांतात मोलाचा - गोपाळराव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2023

'अक्षरलिपी' ग्रंथ साहित्य प्रांतात मोलाचा - गोपाळराव पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
' साहित्य माणसाला समृध्द करतं. डॉ पोतदार यांच्या अक्षरलिपी  या ग्रंथामुळे साहित्यात मोलाची भर पडली आहे. आपल्या  लेखणीने पोतदार यानी अशीच साहित्य सेवा करावी' असे प्रतिपादन दौलत परिवाराचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी केले. हलकर्णी (ता.चंदगड)येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झालेल्या भाषा विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचेमार्फत आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र कार्यक्रमात डॉ.चंद्रकांत पोतदार यांच्या 'अक्षरलिपी' समीक्षा ग्रंथ प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
   प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी प्राचार्य डॉ बी. एम. हिर्डेकर होते.या ग्रंथाला त्यांचीच प्रस्तावना आहे. प्राचार्य डॉ. बी. डी.अजळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी यावेळी व्यासपीठावर अशोक जाधव , संजय पाटील, विशाल पाटील, डॉ.अर्जुन चव्हाण, डॉ. अरुण शिंदे, डॉ. रघुनाथ कडाकणे, आर. पी. पाटील, समन्वयक प्रा. पी. ए. पाटील, नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. व्हि. व्हि. कोलकार यांनी केले तर आभार प्रा. यु. एस. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमी तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment