सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणजे छत्रपती शिवाजी राजे - मिलिंद सनदी, जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2023

सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणजे छत्रपती शिवाजी राजे - मिलिंद सनदी, जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कुळवाडी भुषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी चंदगड तालुक्याच्या वतीने साजरी करण्यात आली. जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. 

        यावेळी बोलताना वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष मिलिंद सनदी म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती जमातीच्या स्वाभिमानी बाणा व ताठ कणा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते स्वराज्य सर्वधर्म समभावाचे प्रतिक होते.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोल्हापूर कार्यकारणी सदस्य देवानंद कदम होते. प्रास्ताविक व स्वागत भेबा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडी कोल्हापूर, जिल्हा महासचिव  दिपक कांबळे, कृष्णांत कांबळे, उपाध्यक्ष दशरथ दीक्षांत, सचिव वर्षा कांबळे इत्यादी पदाधिकारीउपस्थित होते. आभार वित्तल कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment