चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
''सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच विद्यार्थ्यांनी परीक्षांना सामोरे जावे. पायजवळ येईल. जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास प्रथम ध्येय निश्चित करावे ते साध्य करण्यासाठी विविध कौशल्यांचा वापर करावा तीच आपल्याला यशस्वी करतील. "असे प्रतिपादन संजय साबळे यांनी केले. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक बी. बी. कवठेकर होते. पाहुण्यांचा परिचय आर. जी. इनामदार यांनी करून दिला.
श्री. साबळे म्हणाले "कष्टाने मिळवलेल्या यशाची चव अधिक गोड असते. यशाचा मध्यम मार्ग न स्वीकारता प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न जीवनाला झळाळी देतात. " यावेळी इ. १oवीच्या विद्यार्थ्यांची मनोगते झाली.
आदर्श विद्यार्थी म्हणून गणेश कोठेकर तर आदर्श विद्यार्थीनी म्हणून पूजा भास्कळ यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एस. मोरबट्टे तर आभार बी. बी. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment