कोवाड पोलीस चौकीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची निदर्शने - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2023

कोवाड पोलीस चौकीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची निदर्शने


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
चंदगड पोलीस ठाण्या अतंर्गत येणार्‍या कोवाड पोलिस चौकीत पुरेसा कर्मचारीवर्ग द्यावा या मागणीसाठी कोवाड ता.चंदगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने  निदर्शने केली.
        शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
     पंधरा दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक घोळवे यांना कोवाड पोलीस चौकीतील अपुऱ्या कर्मचाऱ्यासंदर्भात  निवेदन देऊन निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला होता. पंधरा दिवस होऊनही कोवाड पोलीस चौकीत कर्मचारीवर्गाची नेमणूक करण्यात आली नाही.त्यामुळे ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी इथल्या बिघडलेल्या कार्यपद्धती बाबत जाब विचारून उद्यापासून येथे कमीत कमी पाच कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना केल्या. तर प्रा. सुनील शिंत्रे यांनी कोवाड पोलीस चौकीत पारदर्शकता येण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली तसेच प्रभाकर खांडेकर यांनी कोवाड पोलीस चौकीत मध्ये आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना वाईट पद्धतीने वागणूक दिली जाते असल्याचे सांगितले. तालुका प्रमुख मनवाडकर यांनी कोवाड पोलीस चौकीत मध्ये असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा ताण कमी करून जास्तीत जास्त कर्मचारी  देण्याची मागणी केली. यावेळी निवेदन स्वीकारून  पोलीस निरीक्षक घोळवे यांनी उद्यापासून कोवाड पोलीस चौकीला पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याचे आश्वासन दिले.
 शिवसेनेच्या या आंदोलनाला कोवाड व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला.यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख विक्रम मुतकेकर, आखलाख भाई मुजावर,  महिला
उपतालु काप्रमुख सौ. गुलाबी शिंदे, उपतालुकाप्रमुख विनोद पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र पाटील, विभागप्रमुख संदीप पाटील, विभाग प्रमुख उत्तम सुरुतकर,कोवाड व्यापारी संघटना अध्यक्ष दयानंद सलाम, उपाध्यक्ष कल्लाप्पा वांद्रे, निटूरचे  सरपंच गुलाब पाटील,  माजी तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर, चंद्रकांत कुंभार, विनायक पोटेकर, जगन्नाथ आंगडी, शहर प्रमुख शिवप्रसाद अंगडी, आनंद फडके, युवासेना उपतालुकाप्रमुख अवधूत भुजबळ, बांधकाम संघटना अध्यक्ष उमाजी पवार, बांधकाम संघटना उपतालुकाप्रमुख विलास बिरजे, युवासेना विभागप्रमुख हेमंत सरशेट्टी, यल्लाप्पा मुतकेकर, शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, गजानन पाटील, शाखाप्रमुख मारुती कांबळे, मल्हार संघटनेचचे अमोल नाईक, सुधीर पाटील
आदीसह शिवसैनिक, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment