हेरे नजिक ६७ हजाराची देशी दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2023

हेरे नजिक ६७ हजाराची देशी दारू जप्त

चंदगड पोलिसांनी जप्त केलेली दारू.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
चंदगड-हेरे रस्त्यावर हेरे (ता. चंदगड) येथे ग्रे कलरच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (गाडी नंबर के ए२२पी १९१६) या चार चाकी गाडीतून देशी संत्रा या दारूच्या १८०मिलीच्या ९६० प्लॅस्टिकच्या बाॅटल्स चंदगड पोलिसानी जप्त केल्या. या दारूच्या मालाची पावती किंवा टी. पी. जवळ न बाळगता बेकायदा बिगर परवाना वाहतूक करताना राजू कृष्णा गवस (रा. गवसे, ता. चंदगड) या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारभावानुसार या दारूची ६७ हजार २०० रूपये तर स्विफ्ट गाडीची २लाख किंमत असा एकुण २ लाख ६७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली.


No comments:

Post a Comment