खेडूतच्या संघातील खेळाडूला उत्कृष्ट फलंदाजी बद्दल बक्षीस देताना नगरपंचायतीचे उत्तम हळदणकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि) आयोजित "पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३" स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या रविवार दि. ५ मार्च रोजी सुपरफोर मध्ये पोहोचलेल्या ४ बलाढ्य संघामध्ये हिंडाल्को स्टेडियम, बेळगाव- वेंगुर्ला हायवे, हिंडगाव- चंदगड फाटा येथे अंतिम फेरीसाठी थरारक सामने रंगणार आहेत. आज झालेल्या सामन्यात प्राथमिक शिक्षक संघाने आरोग्य विभागावर, महावितरण ने तहसील वर, वन विभागाने पोलीस संघावर तर खेडूत स्पोर्ट्स ने एलआयसी वर थरारक विजय मिळवले. उद्या सकाळी १० वाजता प्राथमिक शिक्षक विरुद्ध खेडूत स्पोर्ट्स यांच्यात तर ११.३० वाजता महावितरण विरुद्ध चंदगड वन विभाग यांच्यात सेमी फायनल होणार असून यातील विजेत्या संघांमध्ये अंतिम लढत होईल.
सेमी फायनल व फायनल १०-१० षटकांचे सामने पार पडणार आहेत. अंतिम सामन्यापूर्वी यजमान चंदगड तालुका पत्रकार संघ विरुद्ध ऑफिसर टीम यांच्यात 'प्रदर्शनीय सामना' खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यानंतर विजेता, उपविजेत्य संघास भव्य चषक, विजेत्या संघास 'दक्ष कलेक्शन फिरता चषक' प्रदान करण्यात येणार आहे. (फिरता चषक १ डिसेंबर रोजी पुढील स्पर्धेपर्यंत पत्रकार संघाकडे जमा करणेचा आहे.) स्पर्धेत तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, सहकार क्षेत्रातील कार्यालयांमधील २४ संघातून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले या सर्व ४०० खेळाडूंना चंदगड पत्रकार संघामार्फत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांचा क्रिकेट शौकिनांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघ तसेच सल्लागार कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment