चंदगड पोलिसांच्याकडून विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी शहरातून रुट मार्च - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2023

चंदगड पोलिसांच्याकडून विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी शहरातून रुट मार्च

 

चंदगड पोलिसांनी शहारातून काढलेला रुट मार्च.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील आगामी साजरे होणारे सण  श्रीरामनवमी, रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंदगड शहरातून पोलिसांनी रुट मार्च काढला. 

      यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक, मेन बाजारपेठ, कैलास कॉर्नर, रवळनाथ गल्ली, शहा मदार  मस्जिद, जामा मस्जिद व छत्रपती संभाजी महाराज चौक असा रुट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, १२ अंमलदार, ४ होमगार्ड असा स्टाफ व २ पोलिस यांनी सहभाग घेतला होता. 

No comments:

Post a Comment