कोदाळी येथून एकजण बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2023

कोदाळी येथून एकजण बेपत्ता

 

सत्यवान निंगु गवस

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कोदाळी (ता. चंदगड) येथून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्यांद सोमनाथ गवस यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. सत्यवान निंगु गवस (वय ४८ रा. कोदाळी, ता. चंदगड) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. २८ मार्च २०२३ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून हि व्यक्ती बेपत्ता आहे. 

      वर्दीदार यांचे भाऊ सत्यवान निंगु गवस (वय 48 रा. कोदाळी, ता. चंदगड) हे कोदाळी गावातून फिरून येतो. असे सांगून हॉटेल ग्रीन हील परीसरामध्ये फिरण्यासाठी वर्दीदार यांचे राहते घरातुन कोठेतरी निघुन गेले. ते अद्याप न आल्याने भाऊ सोमनाथ गवस यांनी याबाबतची तक्रार चंदगड पोलिसात दाखल केली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. ना. श्री. भदरगे तपास करत आहेत. 

     बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढीप्रमाणे - रंगाने सावळा, उंची – ५ फूट ५ इंच,  नाक- सरळ, लांब केस काळे-पांढरे, अंगात राखाडी कलरचा टी शर्ट, काळी पॅन्ट मराठी भाषा बोलतात. 

No comments:

Post a Comment