![]() |
पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या दक्ष कलेक्शन फिरता चषकाचे अनावरण करताना मान्यवर |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित ' पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३' स्पर्धा मोठ्या दिमाखात चंदगड तालुक्यात सुरू आहे. स्पर्धेत तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, सहकार क्षेत्रातील कार्यालयांच्या २४ संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील सुपर ८ फेरीचे सामने उद्यापासून सुरू होत आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या 'दक्ष कलेक्शन' कोवाड पुरस्कृत फिरत्या चषकाचे अनावरण कोवाड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोवाडचे व्यवस्थापक अनिकेत कातवरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत दक्ष कलेक्शनचे मालक परशराम गायकवाड यांनी केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी निट्टूर चे सरपंच गुलाब पाटील, सोमशेखर मिस्त्रीकोटी, दत्ता गुरव, एसएम ७ न्यूज चॅनेल चे संपादक व पत्रकार संघाचे सदस्य शहानुर मुल्ला, संजय पाटील आदींची उपस्थिती होती. पत्रकार संघाचे सदस्य संजय कुट्रे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment