'करियर कट्टा' उपक्रम स्पर्धेत कालकुंद्री चे प्रा. बाळकृष्ण तेऊरवाडकर राज्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2023

'करियर कट्टा' उपक्रम स्पर्धेत कालकुंद्री चे प्रा. बाळकृष्ण तेऊरवाडकर राज्यात प्रथम

मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा बाळकृष्ण  तेऊरवाडकर
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रा बाळकृष्ण दत्तू तेऊरवाडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ते कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी असून सध्या  देवगड महाविद्यालयात बीएमएस विभाग प्रमुख व महाविद्यालयीन 'करिअर कट्टा' समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर उत्कृष्ट तालुका समन्वयक म्हणूनही प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धा परीक्षा, बँकिंग परीक्षा, उद्योजकता विकास तसेच व्यवसाय मार्गदर्शन आदी विषयांवर मान्यताप्राप्त मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
    के. जे. सोमैया, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्वायत्त विद्याविहार, मुंबई येथे डॉ शैलेंद्र देवळाणकर, संचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत तेऊरवाडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कामी त्यांना संस्था पदाधिकारी व प्राचार्या डॉ सुखदा जांभळे आदींचे मार्गदर्शन लाभले.No comments:

Post a Comment