पॅनकार्ड आधारकार्ड लिंकीगसाठी मुदतवाढ? वाचा किती वाढली मुदत...... - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2023

पॅनकार्ड आधारकार्ड लिंकीगसाठी मुदतवाढ? वाचा किती वाढली मुदत......

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. यावर्षी २०२३ मध्ये त्यासाठी ३१ मार्च २०२३ हि अंतिम तारीख दिली होती. त्यामुळे लोकांनी पॅन व आधार लिंक करण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र सर्व्हरच्या अडचणीमुळे मुदतवाढ मिळण्यासाठी शक्यता होती. मात्र अनेकवेळा मुदतवाढ दिली असल्याने साशंकता होती. परंतु सायंकाळी आलेल्या आदेशानुसार पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक करण्यासाठीची मुदत ३० जून २०२३ रोजी म्हणजे ३ महिने या कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे. 

     सद्यस्थितीला ज्यांनी पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक केले नाही. त्यांच्यासाठी विलंब शुल्क १००० रुपये भरुन सद्या लिंक करण्याची सोय केली आहे. ज्या नागरीकांना अद्याप पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक केलेले नाही. त्यांनी मुदतीपूर्वी लिंक करुन घेवून एनवेळी होणारी अडचण टाळावी. 

No comments:

Post a Comment