माडखोलकर महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे (पारंपरिक दिवस) उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2023

माडखोलकर महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे (पारंपरिक दिवस) उत्साहात साजरा

ट्रॅडिशनल डे ला उपस्थिती विद्यार्थ्यींनी व विद्यार्थी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         महाविद्यालयीन जीवन हा एक सुवर्णकाळ असतो. याच काळात साजरे होणारे महाविद्यालयातील विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीला चालना देतात. त्यापैकीच एक ट्रॅडिशनल डे हा असतो. खरं तर बदलत्या गतिमान युगात बऱ्याच परंपरागत व सांस्कृतिक पद्धती आपण विसरत चाललो आहोत. त्यामध्ये वेशभूषा, खाद्य पदार्थ, राहणीमान, सवयी-शैली बदलत चालली आहे. त्यांच्या जपणूकीतच ख-या अर्थाने सांस्कृतिक वारसा अबाधित राखू शकतो. असे प्रतिपादन दौलत या लघुपटाचे कलाकार आत्माराम पाटील यांनी मांडले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील वाणिज्य विद्याशाखेच्या वतीने आयोजित पारंपरिक दिवस (Traditional Day) कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 

        प्रारंभी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. आत्माराम पाटील पुढे म्हणाले,  `` खरंच माणसाचे सुख हे परंपरागत- चालीरीती व पद्धतीमध्ये दडलेले आहे. विविध ऋतू नुसार परंपरेने साजरे होणारी सण-समारंभ आणि पारंपारिक जीवनमान हे माणसाला निसर्गाशी समायोजित होण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे चिरंतर विकासाची स्वप्न सांस्कृतिक परंपरेने साकार करता येते.`` अध्यक्षीय समारोपात प्राचार्य पाटील यांनी ``वेगवेगळ्या प्रदेशानुसार विविध फेराव्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती व सर्वांचा सक्रिय सहभाग पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या दिनानिमित्त विद्यार्थी-विद्यार्थीनीना फेटे बांधणे, टाय  बांधणे,  साडी नेसण्यापासून ते परंपरागत मेकअप कसा करावा?अशी विविध कौशल्य अवगत होतात. यामध्ये काही विद्यार्थ्यी दक्षिणेकडील सदरा धोतर  फेराव्यात, काही विद्यार्थ्यांनी भगवा फेटा व पेशवाई सदरा घातलेला तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी-चोळी आसा ड्रेस परिधान केला होता.``

        या कार्यक्रमात लावणी, पोवाडे, बडबड गीत, दांडपट्टा, लाठी-काठी वगैरे दोन डझन पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी पारंपारिक कलाविष्कार सादर केला.  सदर कार्यक्रम हा एक प्रकारचा मिनी स्नेहसंमेलन झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.  यावेळी प्रा. एस. के. सावंत, प्रा. पी. सी. देशपांडे यांच्यासह आठशे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केली. तर आभार डॉ. ए. वाय. जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment