मुलांच्या संवेदनशील मनाला जपा - माधुरी शानभाग, संजय साबळे यांच्या 'बाबांना समजून घेताना ' व 'शाळा विद्यार्थी आणि मी ' या पुस्तकांचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2023

मुलांच्या संवेदनशील मनाला जपा - माधुरी शानभाग, संजय साबळे यांच्या 'बाबांना समजून घेताना ' व 'शाळा विद्यार्थी आणि मी ' या पुस्तकांचे प्रकाशन

 


 चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

      येथील दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री संजय साबळे यांनी मुलांकडून लिहून संपादित केलेल्या 'बाबांना समजावून घेताना ' व शाळा, विद्यार्थी आणि मी 'या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध साहित्यिका माधुरी शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माधुरी शानभाग म्हणाल्या की, "शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्व अनुभव लिहिण्याची संधी दिली पाहिजेत. आपले अनुभव त्यांनी व्यक्त केले तर भावी जीवनात ते नक्की यशस्वी होतील. आपल्या भावना, वेदना शब्दात व्यक्त करणे ही कला आहे आणि ती विद्यार्थीदशेतच जोपासली पाहिजे. यातूनच अशा प्रकारचे साहित्य निर्माण होते. "

पुस्तकाचे संपादक संजय साबळे म्हणाले , "विद्यार्थ्यांच्या लिहित्या हातांना बळ दिले तर ते नक्कीच चांगलं लिहू शकतात आणि म्हणून अशा छोट्या-मोठ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिहिते करणे या पाठीमागचा उद्देश आहे मुलांचे विचार विश्व, भावविश्व समजून घेणे काळाची गरज बनली आहे.".

 आतापर्यंत श्री साबळे यांची मुलांसाठी दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ए. डी .कांबळे यांनी केले कार्यक्रमाला तहसीलदार विनोद रणवरे, माजी प्राचार्य डॉ. एस. पी. बांदिवडेकर, डॉ, पी. आर. पाटील, अॅड. आर. पी. बांदिवडेकर, विद्या बांदिवडेकर, नगराध्यक्ष प्राची काणेकर, एस. आर. देशमुख, एन. डी. देवळे, अॅड. अजित कडुकर, महेश माने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment