तेऊरवाडीत मैदानात शौकिनांची तोबा गर्दी, शंभरावर कुस्त्या..! प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पै बाबा रानगे विजयी - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2023

तेऊरवाडीत मैदानात शौकिनांची तोबा गर्दी, शंभरावर कुस्त्या..! प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पै बाबा रानगे विजयी

प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत बाबा रानगे विजयी झाला तो क्षण.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे श्री रामनवमी निमित्त झालेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पै. बाबा रानगे मोतीबाग तालीम याने पै प्रेम जाधव कंग्राळी- बेळगाव यास एकचाक डावावर चितपट केले. ही कुस्ती माजी मंत्री भरमूआण्णा पाटील व महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते लावण्यात आली. क्रमांक दोनच्या कुस्तीत पै ओमकार पाटील मोतीबाग याने संकल्प पाटील कंग्राळी- बेळगाव यास तर क्रमांक तीनच्या कुस्तीत सुभाष पाटील मोतीबाग जखमी झाल्याने रोहित पाटील कंग्राळी यास विजयी घोषित करण्यात आले. 
मेंढ्यासाठी कुस्ती लावताना शिवाजीराव पाटील, मायाप्पा पाटील, गणेश फाटक व मान्यवर.

   भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी कुस्तीगीर कृष्णा विठोबा राजगोळकर व महादेव लक्ष्मण पाटील तेऊरवाडी यांचा सन्मान करण्यात आला. क्रमांक चार च्या कुस्तीत प्रमोद येवले कवठेपिराण याने किरण पाटील राशिवडे यास आकडी डावावर चितपट केले. क्र. सहाची कुस्ती पै अतुल मगदूम मोतीबाग यांने घिसा डावावर प्रवीण निलजी यास चितपट करत तर क्र. सातच्या कुस्तीत शुभम पाटील तेऊरवाडी- मोतीबाग याने रोहित हल्ल्याळ यास पराभूत करत जिंकली. क्रमांक आठ ची कुस्ती पै विशालकुमार दिल्ली याने पै शुभम कंग्राळी यास, क्रमांक नऊ ची कुस्ती राहुल कसबा नंदगड याने विनायक तेऊरवाडी यास हफ्ते डावावर चितपट करत तर क्रमांक दहाच्या कुस्तीत निरंजन येळ्ळूर याने ओंकार राशिवडे यास पराभूत करत जिंकली.         मैदानाचे आकर्षण ठरलेल्या शिवाजी धनगर व पिंटू धनगर यांनी जंगी मेंढ्यासाठी लावलेल्या कुस्तीत अनुक्रमे पै पार्थ पाटील कंग्राळी याने पै रोहित चव्हाण कवठेपिरान तर पै प्रथमेश पाटील कंग्राळी याने पै आदित्य पाटील कवठेपिरान यांना पराभूत केले. याशिवाय निखिल पाटील निट्टूर, राज पाटील राशिवडे, हर्ष पाटील लहान कंग्राळी, समीर रानमाळे राशीवडे, रितेश पाटील राशिवडे, पृथ्वीराज पाटील कोल्हापूर, सुरज पाटील कडोली, तुषार हडलगेकर निट्टूर, ज्ञानेश्वर तुर्केवाडी आदी पैलवानांनी नेत्रदीपक कुस्त्या केल्या. मैदानात आकर्षण ठरलेली महाराष्ट्र चॅम्पियन भैय्या पवार (शाहू आखाडा) विरुद्ध कर्नाटक केसरी दुंडाप्पा दावणगिरी (दर्गा तालीम बेळगाव) यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. मैदानात जोड पाहून लावण्यात आलेल्या शंभरावर चटकदार कुस्त्यांनी शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी कुस्ती शौकीनांनी प्रचंड गर्दी केली होती.
प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, अशोक पाटील,  वाय बी पाटील आदी 
    यावेळी अशोक जोतिबा पाटील, मायाप्पा पाटील, तुकाराम बेनके, सचिन पाटील, दयानंद सलाम, दयानंद पाटील, मोहन पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती पंच म्हणून लक्ष्मण भिंगुडे, प्रकाश दळवी, सुबराव पाटील, महादेव पाटील, गावडू पाटील आदींनी काम पाहिले. राजाराम चौगुले खेबवडेकर यांच्या अभ्यासपूर्ण धावत्या समालोचनाने व हनमंत घुले यांच्या रणहलगीने मैदानात रंगत आणली. एन व्ही पाटील व मोहन पाटील यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.





No comments:

Post a Comment