![]() |
करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना कमलेश जाधव व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य एस.एस.तुर्केवाडकर व शिक्षक वृंद. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
माणसाचे ध्येय मोठे असेल आणि योग्य दिशेने वाटचाल होत असेल तरच यशाचे ध्येय गाठता येते. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपले शिखर गाठण्यासाठी आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल. यासाठी कठोर परिश्रमांची गरज आहे. स्वप्नांसाठी जो जागतो तोच टिकतो असे प्रतिपादन कमलेश जाधव यांनी केले बागिलगे- डुक्करवाडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बागिलगे येथे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर हे होते.
सुरुवातीला सरस्वती देवतेच्या प्रतिमा पुजनानंतर एम. एन. शिवणगेकर यांनी प्रास्ताविकातून दहावी- बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य दिशा समजण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्याचे स्पष्ट केले. यावेळी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना प्रमुख वक्ते कमलेश जाधव म्हणाले ``झोपेत पडलेली स्वप्न साकार होतातच असे नाही. मात्र स्वप्नांसाठी जो जागा राहतो तोच टिकतो व आपल्या ध्येयाच्या यशापर्यंत निश्चित पोचू शकतो. दहावीनंतर आपण आपली दिशा ठरवली पाहिजेत. योग्य मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास या स्पर्धेच्या युगात आपण टिकून आपली स्वप्नपूर्ती करू घेऊ शकतो यासाठी कठीण परिश्रमाची आज गरज आहे. जीवनातील दिशा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.``
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ टी. व्ही. आणि मोबाईल मध्ये गुंतून न राहता परीक्षे नंतर मिळाल्या वेळेत पुस्तकांचे अवांतर वाचन करून ज्ञानात भर पाडावी. स्वतःची गुणवत्ता ओळखून आपण आपली दिशा निवडावी तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असे ते म्हणाले. यावेळी ए. बी. नाईकवाडी, टी. व्ही. पाटील, पी. एस. मगदूम, एस. जे. पाटील, व्ही. एन. मुंगारे ,जे. एम. मजुकर यांच्यासह दहावी-बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जी. शिवनगेकर यांनी केले तर आभार व्ही. जे. कालकुंद्रीकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment