तेऊरवाडी गावाला लाभ क्षेत्राबाहेरील घटप्रभा प्रकल्पातून शेतीपाणी पुरवठा योजनेस शासनाची मंजूरी - आमदार श्री. पाटील यांचे प्रयत्न - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2023

तेऊरवाडी गावाला लाभ क्षेत्राबाहेरील घटप्रभा प्रकल्पातून शेतीपाणी पुरवठा योजनेस शासनाची मंजूरी - आमदार श्री. पाटील यांचे प्रयत्नएस. के. पाटील -/ तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालूक्यातील तेऊरवाडी या कोरडवाहू गावाला घटप्रभा मध्यम प्रकल्पातून लाभ क्षेत्रा बाहेरील क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची खास बाब म्हणून परवानगी मिळाल्याची माहीती आमदार राजेश पाटील व अशोक पाटील यांनी दिली.

      शासनाकडे कोरडवाहू गाव म्हणून नोंद असलेल्या तेऊरवाडी गावामध्ये  हजारो एकर शेतजमिन आहे. पण पाणी नसल्याने ती पडीक आहे. गेल्या २५ वर्षापासून तेऊरवाडीती सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील हे माजी आमदार कै नरसिंगराव पाटील यांच्या मदतीने शासनाकडे या पाणी योजनेसाठी पाठपूरावा करत होते. पण तेऊरवाडी चंदगड तालूक्यात तर घटप्रभा नदी गडहिंग्लज तालुक्यात यामुळे कार्य क्षेत्राबाहेर सिंचन क्षेत्र येत असल्याने शासनाकडून परवानगी मिळत नव्हती. यानंतर आमदार राजेश पाटील यानी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे या नदिवरून पाणी योजनेसाठी प्रयत्न केले. 

          या संबधीत सर्व कागदपत्रांची पूर्तता अशोक पाटील यांनी करून याचा शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला. या सर्वांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने घटप्रभा मध्यम प्रकल्पातून घटप्रभा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रा बाहेरील तेऊरवाडी गावाच्या ८१. २४ हेक्टर (११७.८० हे. पीक क्षेत्र) एवढ्या क्षेत्रास सिंचनासाठी परवानगी दिली आहे. घटप्रभा प्रकल्पाचे  एकुण सिंचन क्षेत्र ४७८. ४ हेकटर (सिंचन क्षमता ६९३७ हे.) इतकी आहे. यामधील शिल्लख पाणी साठा वापरण्यास परवानगी मिळाल्याने तेऊरवाडी ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे. या पाण्याचा उपयोग हडलगे गावच्या शेतकऱ्यांनाही होणार आहे. एकंदरीत आमदार राजेश पाटील व अशोक पाटील यांच्या अथक प्रयत्नाने या योजनेस परवानगी मिळाल्याने आता तेऊरवाडीच्या पठारावरील माळ हिरवेगार होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment