पाटबंधारे खात्याकडून दुप्पट पाणीपट्टी वसुली...? शिवसेना उद्धव पक्षाचे अधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2023

पाटबंधारे खात्याकडून दुप्पट पाणीपट्टी वसुली...? शिवसेना उद्धव पक्षाचे अधिकाऱ्यांना निवेदन

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने किंबहुना दुपटीने पाणीपट्टी कर वसूल केला जात असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यशवंतनगर (ता. चंदगड) येथील पाटबंधारे कार्यालय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबतचे निवेदनही अधिकाऱ्यांना देण्यात आले. पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून मनमानी पद्धतीने परस्पर पाणीपट्टी कर वसूल केला जात आहे. तसेच परवानाधारक शेतकऱ्याकडूनही पाणी पट्टी वसुली केली जात आहे. पठाणी पद्धतीच्या अशा वसुलीमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. एकाच बाजूने पाणी पट्टी घ्यावी व पाचवाईने पाणी घेणाऱ्या शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा. याची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर उपतालुकाप्रमुख विनोद पाटील विभाग प्रमुख संदीप पाटील, शाखाप्रमुख मारूती पाटील दुंडगे, भुजंग चौगुले, मारूती कांबळे, ग्राम पंचायत सदस्या वंदना कृष्णा पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment