'महा ई सेवा' क्रिकेट लिगचे आज उदघाटन - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2023

'महा ई सेवा' क्रिकेट लिगचे आज उदघाटन


चंदगड : सी एल वृत्तसेवा

चंदगड तालुका महा-ई-सेवा केंद्र संघटना यांच्या वतीने आयोजित शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी व पत्रकार यांच्या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन आज दिनांक ०१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता हिंडाल्को क्रीडांगण (पप्पू पेट्रोल पंप नजीक) बेळगाव वेंगुर्ला हायवे येथे संपन्न होणार आहे.

उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते  दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मा.  अमृत सी. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास सहन्यायाधीश चारुदत्त यु. शिपुकले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तहसीलदार विनोद रणवरे आरोग्य अधिकारी बी. डी. सोमजाळ, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार पांडूरंग ढेरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाचा पहिला सामना चंदगड पत्रकार संघ विरुद्ध पंचायत समिती चंदगड यांच्यात होणार असून स्पर्धेत शासकीय निमशासकीय कार्यालयांच्या २४ संघांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटन कार्यक्रम व स्पर्धांचा क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन चंदगड तालुका सर्व महा ई सेवा केंद्र चंदगड चे पदाधिकारी अध्यक्ष इकबाल मुल्ला, सचिव अमित पेडणेकर, उपाध्यक्ष पिराजी रेडेकर, कार्याध्यक्ष फारुक नाईक, खजिनदार महेश कुंभार, संपर्क प्रमुख जोतीबा कांबळे व सदस्यांनी केले आहे.No comments:

Post a Comment