कालकुंद्री येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिर जीर्णोद्धार संकल्प...! लाखोंच्या देणग्या जमा - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2023

कालकुंद्री येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिर जीर्णोद्धार संकल्प...! लाखोंच्या देणग्या जमा

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन करताना माजी कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील सोबत सरपंच छाया जोशी, सुरेश गडकरी, एम जे पाटील, शंकर कोले, मनोहर पाटील, विनोद पाटील, गजाभाऊ पाटील आदी


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला असून मंदिराचा भूमिपूजन तसेच मंदिर बांधकामासाठी आणलेल्या पहिल्या अकरा दगडांचा शिलापूजन कार्यक्रम नुकताच विधीवत संपन्न झाला. सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गावचे सुपुत्र व माजी कोकण विभागीय आयुक्त विलास बाळाराम पाटील, रामराव हरिभाऊ पाटील, हनमंत यल्लाप्पा पाटील, सुरेश तातोबा गडकरी व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
   बांधकाम कमिटी अध्यक्ष मनोहर पाटील यांनी स्वागत केले, प्रास्ताविक प्रा. व्ही आर पाटील यांनी केले. यावेळी बोलताना विलास पाटील, सुरेश गडकरी, एम जे पाटील यांच्यासह सर्व वक्त्यांनी मंदिराच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काळ्या दगडात नूल (ता. गडहिंग्लज) येथील मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारण्यात येणार आहे. भूमिपूजन व दगड पूजन प्रसंगी ग्रामस्थ व भाविकांकडून मंदिर उभारणीसाठी भरघोस रोख देणग्या जाहीर करण्यात आल्या. यात जोतिबा अमृत पाटील ११ लाख ११ हजार १११, श्रीमती लक्ष्मी महादेव जोशी ५ लाख ५५ हजार ५५५, गजाभाऊ रामराव पाटील २ लाख १ हजार, हनमंत यल्लाप्पा पाटील १ लाख २५ हजार, सुरेश तातोबा गडकरी व नरसू रामू तेऊवाडकर प्रत्येकी १ लाख २१ हजार, विनोद अशोक पाटील १ लाख १५ हजार,  स द पाटील, महादेव कल्लाप्पा पाटील, यशवंत यल्लाप्पा पाटील, अशोक रामू पाटील, प्रा व्ही आर पाटील, डॉ हरीश पाटील प्रत्येकी १ लाख ११ हजार १११, विष्णू रामू गिरी, वैजनाथ सुबराव पाटील, बाजीराव यल्लाप्पा पाटील, अण्णाप्पा कल्लाप्पा जोशी, मनोहर बाळू पाटील, कल्लाप्पा पद्मू पाटील, ज्ञानोबा ज्योती पाटील, सुबराव गणपती पाटील, एस ए पाटील, अशोक कल्लाप्पा पाटील, अरविंद लक्ष्मण कोकितकर प्रत्येकी ५१ हजार रुपये, बाबू लक्ष्मण पाटील, विठोबा राणबा मुंगुरकर प्रत्येकी २५ हजार, माजी सरपंच आप्पाजी वरपे व दत्तू कृष्णा पवार ( कुदनूर) प्रत्येकी ५ हजार, विष्णू आडाव (कोवाड) २१००, तानाजी तुपारे (ढोलगरवाडी) ११११ आदींनी रोख देणग्या दिल्या. तर नवीन मंदिर समोरील भव्य कमानीच्या उभारणीचा पूर्ण खर्च शंकर व परशराम वैजनाथ पाटील बंधुंनी देण्याचे जाहीर केले. लवकरच नवीन मंदिर उभारण्याचे काम सुरू करणार असल्याचे बांधकाम कमिटीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपसरपंच संभाजी पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सप्ताह कमिटी सदस्य व मान्यवरांसह भाविक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. आभार अरविंद कोकितकर यांनी मानले. 


No comments:

Post a Comment