चंदगड शहरामध्ये `चाळीशी नंतरचे आरोग्य` या विषयावर २८ मार्चला व्याख्यान, डॉ. गावडे यांच्या वतीने आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2023

चंदगड शहरामध्ये `चाळीशी नंतरचे आरोग्य` या विषयावर २८ मार्चला व्याख्यान, डॉ. गावडे यांच्या वतीने आयोजन

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     येथील रुक्मिीणी क्लिनिक, गुरुवार पेठ चंदगड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जनतेमध्ये आरोग्याविषय़ी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले जाते. याच धर्तीवर मंगळवार २८ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता येथील श्री रवळनाथ पतसंस्था सभागृह, रामदेव गल्ली चंदगड येथे `चाळीशी नंतरचे आरोग्य` या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. व्याख्यानाला प्रमुख वक्त्या म्हणून संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज महागांवच्या प्राचार्या डॉ. मंगला मोरबाळे मार्गदर्शन करणार आहेत.

        आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आध्यात्मिक विषयावरील प्रवचन, भाषण, किर्तन बरेच वेळा ऐकतो, वाचन करतो पण आरोग्या विषयीचे संभाषण भाषण अथवा वाचन कमीच असते. ज्यांना आरोग्याविषयी जाणून घ्यायचे आहे. त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवावी असे आवाहन रुक्मिीणी क्लिनिकचे डॉ. आर. एन. गावडे यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी डॉ. गावडे यांच्या ९४२१२०५६६३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment