हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत शहीद दिवस साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2023

हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत शहीद दिवस साजरा



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत शहीद दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील होते. प्रारभी प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. जी. जे. गावडे यांनी केले तर सर्वांचे स्वागत प्रकल्प अधिकारी प्रा. यू. एस. पाटील यांनी केले.  प्रा. पी. ए. पाटील यांनी भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात घेतला. 

      यावेळी देशाच्या आझादीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या पावन स्मृतीस सर्वांनी विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी नॅक चे समन्वयक डॉ. राजेश घोरपडे सहसमन्वयक डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. के. एम. गोनुगडे, प्रा. ए. एस. जाधव, प्रा. एस. डी. तावदारे, बी. बी. नाईक, प्रा. एस. एन. पाटील, संदीप पाटील, तेजस पाटील, निलेश सदावर, प्रा. वर्षा साळुंखे महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी इतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी मानले.

No comments:

Post a Comment