माणगाव ते डुक्करवाडी रस्त्याची दुर्दशा, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2023

माणगाव ते डुक्करवाडी रस्त्याची दुर्दशा, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

माणगाव-डुक्करवाडी रस्त्याची झालेली दुरावस्था.
 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ग्रामपंचायत डुक्करवाडी (ता. चंदगड) यांच्या वतीने माणगाव ते डुक्करवाडी या अडीज कि. मी. रस्त्याची दुर्दशा झाली असून त्यामुळे अपघाताला निमंत्रण देत आहे. याबाबत वारंवार विचारणा केली असता निधी मंजूर आहे, काम सुरुवात होईल अशी सांगण्यात येते. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. या दुरावस्थेमुळे वाहतुकीला खूप त्रास होत असून हे काम लवकरात लवकर सुरू करावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

     ग्रामपंचायत डुक्करवाडी यांच्या वतीने बांधकाम विभागाला याबाबतचे निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या वेळी बेळगाव वेंगुर्ला रोड वरील तांबुळवाडी फाटा येथे आंदोलन करून वाहतूक व्हाया डुक्करवाडी माणगाव पाटणे फाटा मार्गे पाठवण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच सुजाता यादव, ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक, डॉक्टर रघुनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग घोळसे, रवींद्र सुतार, नंदकुमार तुर्केवाडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment