माणगाव बीट अंतर्गत 'पोषण आहार पंधरवडा', २४ अंगणवाड्यांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2023

माणगाव बीट अंतर्गत 'पोषण आहार पंधरवडा', २४ अंगणवाड्यांचा सहभाग

 

माणगाव बीट अंतर्गत पोषण आहार पंधरवडा जनजागृती प्रभात फेरी काढताना अंगणवाडी सेविका. 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय चंदगड, बीट माणगाव अंतर्गत माणगाव येथे 'पोषण आहार पंधरवडा' कार्यक्रम सुरू करण्यात आला. उपक्रमाच्या जनजागृतीसाठी माणगाव बीट अंतर्गत सर्व २४ अंगणवाडी  मधील सेविका, मदतनीस यांच्या वतीने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी बेटी बचाओ- बेटी पढाओ, लक्ष्मी आली घरा- तिचे स्वागत करा, सही पोषण- देश रोशन अशा घोषणा देत प्रबोधन करण्यात आले. 

 मुलीच्या जन्माबद्दल आई व बाळाचे स्वागत व अभिनंदन करताना प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सेविका.

     केंद्र शाळा माणगाव येथे मांडण्यात आलेल्या पाककृती प्रदर्शनात डुक्करवाडी, बागिलगे, शिवणगे, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, जक्कनहट्टी, माणगाव, बसर्गे, गौळवाडी, मलगड, लाकुरवाडी, हुंबरवाडी, माणगावाडी, लकिकट्टे येथील अंगणवाडी सेविकांनी  पदार्थातून सर्व जीवनसत्त्वे बाळाला मिळतील असे पदार्थ मांडले होते. 

    अन्नप्राशन दिवस अंतर्गत ० ते ६ महिन्याच्या बाळाला अंगणवाडी येथे बोलावून त्याचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला. मुलींच्या जन्माचे स्वागत या विषयांतर्गत मुलीच्या आईचे व बाळाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी वनिता इष्टे यांनी हा कार्यक्रम ४ एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून या काळात तालुक्यात विभाग वार रोज विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या उपक्रमात परिसरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. आभार अंगणवाडी सेविका मनिषा नाईक यांनी मानले. पाककृती प्रदर्शनात सहभागी अंगणवाडी सेविका.No comments:

Post a Comment