जट्टेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ अडसूळे याना गुरुदेव आदर्श शिक्षक पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2023

जट्टेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ अडसूळे याना गुरुदेव आदर्श शिक्षक पुरस्कार

कोल्हापूर येथील शाहु स्मारक भवन येथे मजरे जट्टेवाडी (ता. चंदगड) शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक नागनाथ आडसुळे यांना  जिल्हास्तरीय गुरुदेव आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना माजी जि. प. अध्यक्ष राहुल पाटील बाजूला अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष मुळीक, व्हाईट आर्मीचे रोकडे, माजी सभापती आदिल फरार, कादर मलबारी, सुतार, काझी आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          मजरे जट्टेवाडी (ता. चंदगड) शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक नागनाथ व्यंकटराव आडसुळे यांना गगनबावडा येथील सर्वोदय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय  गुरुदेव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे डाॅ. शिवाजीराव भोई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आम. पी. एन. पाटील यांच्या वतीने माजी जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे, महानगरपालिकेचे माजी सभापती आदिल फरार, कादर मलबारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

           श्री. अडसूळे यांचे मजरे जट्टेवाडी शाळेत १४ वर्ष उत्कृष्ट शैक्षणिक कार्य सुरू आहे. शाळेचे ऑनलाईन काम असो कि शाळा शैक्षणिक व गुणवत्ता कार्यक्रमात ते नेहमीच आग्रेसर असतात. शाळेला शैक्षणिक उठावातून तीन गुंठे जागा, सर्व मुलांना बेंच, हिरवीगार शाळा अशा अनेक गोष्टी शाळेसाठी केल्या.यासाठी त्याना तत्कालीन मुख्या. विनायक पाटील संजय ठाकरे  व सौ. मनिषा कांबळे, बाबुराव वर्पे, अशोक भोईटे, तत्कालीन केंद्रप्रमुख नारायण मगदूम, श्रीकांत शिंदे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्र मुख्याध्यापक प्रकाश पाटील, विद्यमान केंद्रप्रमुख डी. टी. कांबळे यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment