चंदगड येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या, काय आहे कारण...? - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2023

चंदगड येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या, काय आहे कारण...?

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       दिर्घ आजाराला कंटाळून चंदगड येथील रवळनाथ गल्लीतील क्लायमेंट ॲलेक्स पिन्टो (वय वर्ष ५४) या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (शुक्रवारी) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

   क्लायमेंट हा मनोरुग्ण आजाराने त्रस्त होता. या आजाराला कंटाळून त्याने काल आपल्या राहत्या घरी किचन रूम मध्ये असलेल्या फॅनला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद सॅमसन धुपदाळे यांनी चंदगड पोलीसात दिली असून अधिक तपास पोहेकाॅ मकानदार करत आहेत. 

No comments:

Post a Comment